Belagavi

बैलगाडी शर्यतीतील विजेत्यांना आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले पारितोषिक वितरण

Share

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील तुरमुरी गावात रविवारी झालेल्या भव्य बैलगाडी शर्यतीतील विजेत्यांना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

यावेळी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आजही ग्रामीण खेळ सुरू ठेवणाऱ्या आयोजकांच्या कार्याचे कौतुक करून सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी गावातील शेतकरी युवराज कदम, रघुनाथ खांडेकर, मोनाप्पा जाधव, मल्लाप्पा तंगणकर
नागनाथ जाधव, नारायण गावडे, बाबू बेळगावकर, प्रकाश चलवेटकर , अप्पाना खांडेकर आदी उपस्थित होते.

Tags: