Belagavi

बेळगावच्या बिशप हाऊसमध्ये ख्रिसमस साजरा

Share

बेळगावमधील बिशप हाऊसमध्ये विविध राजकीय , सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांसह ख्रिसमस सण साजरा करण्यात आला . यावेळी उपस्थित मान्यवरांनी बिशपचे अभिनंदन करून त्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या . यावेळी शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे त्यांनी बिशप यांचे कौतुक केले .

रविवारी रात्री , , बेळगावमधील राजकीय , सामाजिक तसेच विविध क्षेत्रातही मंडळींसह बिशप डेरेक फर्नांडिस यांनी केक कापून ख्रिसमस सण साजरा केला . यावेळी उपस्थितांनी बिशपना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या . यावेळी आ . लक्ष्मी हेब्बाळकर , माजी आ . फिरोज सेठ , राजू सेठ , सादिक सेठ , तसेच एसपी डॉ . संजीव पाटील, डॉ . एम व्ही जाली , डॉ . व्ही डी पाटील , नितीन शिरगुरकर तसेच लुईस रॉड्रिग्ज आणि अन्य मान्यवरांनी बिशप डेरेक फर्नांडिस याना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या .

यावेळी आ . लक्ष्मी हेब्बाळकर तसेच माजी आ . फिरोझ सेठ यांनी , ख्रिश्चन समाज शांतीप्रिय समाज आहे तसेच या समाजाचे शिक्षण क्षेत्रात भरीव असे योगदान आहे . त्यांच्या दर्जात्मक शिक्षण पद्धतीमुळेच आमची मुले देखील या शाळांमधून उत्तम शिक्षण घेऊन उच्चशिक्षित होत आहेत .
यावेळी बिशप डेरेक फर्नांडिस यांनी देखील उपस्थितांना शांती, आणि सौहार्दतेचा संदेश दिला .

Tags: