बेळगावात होत असलेले अधिवेशन फलदायी व्हावे, उत्तर कर्नाटकाबाबत गांभीर्याने चर्चा व्हावी, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
दिल्लीला रवाना होण्यापूर्वी आज सुवर्णसौध येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, बेळगावचे अधिवेशन फलदायी झाले पाहिजे. उत्तर कर्नाटकाबाबत सर्वसमावेशक चर्चा व्हावी, आम्ही कोणत्याही विषयावर चर्चा करण्यास तयार आहोत.
आज दुपारी दिल्लीला जाणार आहे. याआधी मी गेलो होतो, पण त्यावेळी चर्चा बैठक अपूर्ण राहिली होती. आजच्या बैठकीत पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहभागी होतील. निवडणूक तयारी, मंत्रिमंडळ विस्तार यावर चर्चा होईल, मी सर्व गोष्टींवर चर्चा करेन, शक्य झाल्यास सिंचन प्रकल्पांबाबत चर्चा करेन असे बोम्मई यांनी सांगितले.
मंत्रिमंडळात आज कोविड जनजागृतीबाबत, बूस्टर डोसवर अनिवार्य करण्यासाठी दुपारी उच्चस्तरीय तज्ज्ञांची बैठक घेऊन चर्चा होणार आहे, लोकांच्या जीवनात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जातील. नवीन वर्ष स्वागत समारंभाचे दिशानिर्देश ठरवण्यात येतील. काही नियम जोडले जातील आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही अशा पद्धतीने त्यांची अंमलबजावणी केली जाईल असे बसवराज बोम्मई म्हणाले.
एकंदर अधिवेशनाच्या दरम्यानच मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर जात असल्याने त्याचे फलित काय असेल याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे.


Recent Comments