Khanapur

इटगी पशुवैद्यकीय रुग्णालयात लवकरात लवकर पशुवैद्य नेमण्याची मागणी

Share

खानापूर तालुक्यातील तोलगी गावात आणखी एक गाय लंपी रोगाने मरण पावली. शंकर दोड्डप्पनवर यांच्या मालकीची 70 हजार रुपये किमतीची गाय लंपी आजाराने मरण पावली.
व्हॉइस ओव्हर : खानापुर तालुक्यात आजकाल गाठींच्या आजाराने गुरे मरत आहेत, योग्य उपचाराअभावी गुरे मरत आहेत, तसेच पशुवैद्यकीय डॉक्टरांचा अभावही दिसून येत आहे केवळ त्यांचे सहाय्यक आजारी जनावरांवर उपचार करीत आहेत .

शेतकरी नेते बसनगौडा पाटील यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त करताना सांगितले की, चिक्क मुनवल्ली, हिरेमुनवल्ली, करविनकोप्पा, तोलगी, बोगोर आदी गावांमध्ये एकच इटगी पशु चिकित्सालय आहे. शिवाय येथे डॉक्टर नाही, केवळ त्यांचे सहाय्यक उपचार करत आहेत. आम्ही अनेकवेळा वरिष्ठांकडे दाद मागितली, आमच्या तालुका प्रशासनाकडून आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, तहसीलदार डोळेझाक का करत आहेत? तुम्हाला लाज वाटली पाहिजे, मी तुम्हाला अनेकवेळा आवाहन केले आहे, मी तुम्हाला सांगितले आहे की तुम्ही काय करत आहात, तुम्ही पोटासाठी अन्न खाता कि माती खाता ? शेतकर्याचे जीवन असलेले गाई-बैल मरत आहेत. या भागासाठी पशुवैद्य द्या . आमच्याकडून तुम्हाला हा शेवटचा इशारा आहे . चार दिवसात डॉक्टर नाही दिला तर तीव्र आंदोलन करू , असा इशारा त्यांनी दिला.  यावेळी इतर शेतकरी उपस्थित होते.

Tags:

basangouda-patil-warns-for-appointing-new-veterinarian/