Vijayapura

मुख्यमंत्र्यांनी आरक्षणासंदर्भात दिलेले वचन पाळावे : आ. यत्नाळ

Share

भाजपचे विजापूर शहराचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी सीएम बसवराज बोम्मई यांना इशारा दिला आहे की, जर वचन पाळला नाहीत तर कुमारस्वामींसारखेच तुमच्या नशिबी येईल .

विजापूर शहरात बोलताना आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ म्हणाले कि , मुख्यमंत्र्यांनी २९ तारखेला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. आरक्षण जाहीर होईल, अशी आशा आहे . 2अ प्रवर्गात समान आरक्षण मिळेल. सीएम बसवराज बोम्मयी यांनी पंचमसाली समाजाला 2 अ आरक्षण देण्यासंदर्भात आईची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री दिलेले आश्वासन पूर्ण करतील, इतर समाजाने आरक्षणाचा हक्क मागायला आमची हरकत नाही. ते म्हणाले, सरकार सर्व काही तपासून आरक्षण देईल, असा आम्हाला विश्वास आहे.

Tags: