Belagavi

मंजुनाथ भारती स्वामीजींची बेळगावमधील विविध समाजातील प्रमुखांशी भेट

Share

सर्व समाजाच्या लोकांनी सर्व प्रथम आपण माणूस आहोत हे जाणून, समाजाचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रित येऊन विकास साधावा. मराठा समाजाच्या मागणीला सर्वानी पाठिंबा द्यावा असे आवाहन बेंगळूरच्या गोसावी मठाचे श्री श्री श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांनी केले.

बेळगावमधील विविध समाजप्रमुखांची श्री श्री श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांनी आज रविवारी भेट घेतली. त्यावेळी बोलताना त्यांनी हे आवाहन केले. यावेळी श्री विश्वकर्मा मनु-मय संस्था, दैवज्ञ ब्राम्हण समाज, व अन्य समाजांचे प्रमुख तसेच भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव व सकल मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव उपस्थिती होते. प्रारंभी संस्था प्रमुखांनी उपस्थितांचे स्वागत केले व समाजाच्या वतीने स्वामीजींची पाद्यपुजा करून पुष्प हार, श्रीफळ व शाल अर्पण करून वंदन केले. विश्वकर्मा मनु-मय संस्थेतील मुख्य कार्यकारी मंडळी भारत शिरोळकर, प्रभाकर सुतार, किशोर कणबरकर, सोहन सुतार, किसन ठोकणेकर, विजय सुतार आदी उपस्थित होते.

त्याचप्रमाणे दैवज्ञ ब्राम्हण समाजातर्फे प्रदीप अर्कसाली, अमित हेरेकर, सागर हळदणकर, प्रकाश कलघटकर, सचिन कारेकर, किरण कारेकर, गुरुनाथ शिरोडकर, सुरेश चिंचणेकर, विजय सांबरेकर उपस्थित होते. संत गाडगेबाबा महाराज मराठी रजक समाजातर्फे विठ्ठल पालेकर, मयुर चव्हाण, विष्णु सरोळकर, विनायक पवार, विक्रम किल्लेकर, ज्योतिबा उपरडेकर, सतीश लकले, मंगण्णा पालेकर, परशराम अष्टेकर, लखन परिट, राजू यादव यावेळी उपस्थित होते. या वेळी सर्वांनी स्वामीजींची भेट घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी मंजूनाथभारती स्वामीजींनी, सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या 2-ए प्रवर्गात समावेशाच्या भूमिकेला पाठींबा देऊन मराठा समाजाने सरकारकडे केलेल्या मागण्यांचे समर्थन करण्याचे आवाहन केले.

Tags: