कागवाड तालुक्याच्या दलित संघर्ष समितीने शेकडो कार्यकर्त्यांना एकत्र करून कागवाड येथील राणी चन्नम्मा सर्कलमध्ये ‘संविधानाचा स्वीकार , मनुस्मृतीला नकार ‘ हा कार्यक्रम आयोजित केला होता.

कागवाड येथील राणी चन्नम्मा सर्कलमध्ये रविवारी सकाळी दलित संघर्ष समितीचे जिल्हा समन्वयक संजय तळवलकर, कुमार बनसोडे, मच्छिंद्र कांबळे, सचिन पुजारी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मनुस्मृतीच्या प्रती जाळल्या व आपला संताप व्यक्त केला.

दलित संघर्ष समितीचे जिल्हा समन्वयक संजय तळवलकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हा कार्यक्रम 25 डिसेंबर 1927 रोजी सुरु केला . या दिवशी उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्य, जात आणि लिंग अशी विषमता लादणाऱ्या दलित, मागास आणि शूद्र समाजाविरुद्ध असलेली ‘मनुस्मृती ‘ जाळली. आता दलित संघर्ष समितीच्या वतीने कर्नाटक राज्य समिती तसेच देशात हा कार्यक्रम घेतला जात आहे .डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जगदज्योती बसवेश्वर, तुकाराम महाराज, कबीर दास इत्यादी महान व्यक्तिमत्वांनी , मनुस्मृतीला विरोध दर्शवला आहे. . ते म्हणाले की, तालुक्यातील दलित बांधवांनी या ’ कार्यक्रमात सहभाग घेऊन आंदोलन यशस्वी केले.
आंदोलनात प्रकाश कांबळे, बाळासाहेब कांबळे, गौतम कांबळे, जयपाल बडिगेर, उदय खोडे, विशाल दोंदरे, जनार्दन दोंदरे, राहुल कांबळे, प्रकाश दोंदरे, दीपक कांबळे, बाळकृष्ण भजंत्री आदी दलित नेते सहभागी झाले होते.


Recent Comments