Belagavi

बेळगाव शहर उपनगरात ख्रिसमस सण उत्साहात

Share

बेळगाव शहर आणि उपनगरांमध्ये , ख्रिश्चन बांधवानी मोठ्या धार्मिकतेने आणि उत्साहात ख्रिसमस सण साजरा केला .

मागील 3 वर्षांपासून देशात कोरोना संसर्गामुळे निर्बध असल्याने , सर्वच सणवार अगदी साध्यापद्धतीने आणि घरापुरतेच मर्यादित होते . पण यंदा तशी परिस्थिती नसल्याने , सर्व ख्रिश्चन बांधवानी मोठ्या उत्साहात मध्यरात्रीपासूनच चर्चमध्ये प्रार्थना केली . प्रभू येशूचा जन्मोत्सव साजरा करून , जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली .

ख्रिसमसच्या निमित्ताने , शहरातील चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे . येशूच्या जन्माचे देखावे सादर करण्यात आले आहेत . ख्रिस्त धर्मगुरूंनी , चर्चमध्ये विशेष प्रार्थना करून येशू बद्दल माहिती दिली . येशूने दिलेल्या संदेशाचे जीवनात पालन करावे असे सांगितले . जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली .

बेळगाव ख्रिश्चन धर्मप्रांताचे मुख्यालय असलेल्या कॅम्पमधील फातिमा कथेड्रल चर्च मध्ये विशेष प्रारण करण्यात आली . बिशप डेरेक फर्नांडिस यांनी सर्व ख्रिश्चन बांधवाना , नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या . त्याच प्रमाणे सेंट ऍंथोनी चर्च , मेथॉडिस्ट चर्च , सहित अनेक चर्च मध्ये ख्रिश्चन बांधवानी मोठ्या संख्येने देऊन , प्रभू येशूची प्रार्थना केली त्याचप्रमाणे , कॅरोल्स गायन केले .
मेथॉडिस्ट चर्चच्या धर्मगुरूंनी देखील बेळगावच्या जनतेला ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या .

एकंदर , कोरोनामुळे दोन वर्ष ख्रिसमस सण मोठ्या प्रमाणावर साजरा होऊ शकला नव्हता . मात्र यंदा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने हा सण साजरा करण्यात आला .

Tags: