Belagavi

१.३८ कोटी रु. खर्चाच्या रस्त्यांच्या कामाला चन्नराज हट्टीहोळींकडून चालना

Share

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील मास्तमर्डी, बसरीकट्टी आणि तारिहाळ गावांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या विकासासाठी १.३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी रविवारी मास्तमर्डी गावात पूजा करून कामाचा शुभारंभ केला.

या वेळी अशोक तोरली, प्रकाश पाटील, संतोष मद्देप्पगोळ, यल्लाप्पा तोरली, महंतव्वा मरकट्टी, श्रीशैल पाटील, सुरेश पाटील, विजय पाटील, बाबू तोरली, बसवराज कोलकार, इराप्पा मथरी, राघवेंद्र माविनकट्टी, चंद्रू जंगली, मारुती चौगुला, महंतराव मरकट्टी आदी उपस्थित होते.

नंतर शगनमट्टी गावातील रस्त्यांच्या कामासाठी 20 लाख रुपये खर्चातून काँक्रीट रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजनही चन्नराज हट्टीहोळी यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी गावातील ज्येष्ठ संतोष हडकर, विश्वनाथ किलिकेतर, महावीर पाटील, पारिस पाटील, संतू सनदी, गुंडू देसाई, रफिक सनदी, राजू पाटील, सुभाष पाटील, हनुमंत पाटील, फकीर पाटील, नागेश मागेरी आदी उपस्थित होते.

Tags: