झारखंडमधील सम्मेद शिखरजी हे जैन समाजाचे पवित्र क्षेत्र आहे. पण तेथील सरकार आता जैन धर्माच्या नियमांच्या विरोधात तेथे इको-टूरिझम क्षेत्र करणार आहे. याच्या निषेधार्थ आणि हा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी उद्या 25 डिसेंबर रोजी चिक्कोडी शहरात मोठ्या निषेध मोर्चाचे आयोजन केल्याची माहिती शांतीसागर दिगंबर जैन संघाचे अध्यक्ष एस. टी. मुन्नोळी यांनी दिली.

व्हॉईस : चिक्कोडी लोकसभा मतदार संघातील विविध तालुक्यांतील १० हजारांहून अधिक जैन समाजाचे लोक शहरातील महावीर चौकातून गुरुवार पेठ, अंकलीखूट, बसव सर्कलमार्गे आरडी हायस्कूलच्या मैदानावर एकत्र येणार आहेत. तेथे कोल्हापूरचे लक्ष्मीसेन भट्टाचार्य महास्वामीजी, नांदणी मठाचे प.पू. जिनसेन भट्टाचार्य स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली मेळावा होणार आहे. माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार कल्लाप्पाण्णा मगेन्नावर, मोहन शहा, उत्तम पाटील यांच्यासह जैन समाजाचे नेते उपस्थित राहणार आहेत असे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत जैन समाजाचे नेते वर्धमान सदलगे, रणजित संगरोळी, डॉ. पद्मराज पाटील, शिरीष मेहता, दर्शन उपाध्ये, रावसाब केस्ती, राजू लडगे, अमित शहा, मोहनलाल ओसवाल, प्रवीण मेळवंकी आदी उपस्थित होते.


Recent Comments