युवती आणि महिलांनी स्वतःचे संरक्षण स्वतःच करण्यासाठी स्वसंरक्षणाची कला शिकून घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले.
समाजकल्याण विभाग, मागासवर्गीय कल्याण विभाग, अनुसूचित जाती-जमाती कल्याण विभाग आणि कर्नाटक निवासी शिक्षण संघाच्या वतीने निवासी शाळांतील विद्यार्थिनींसाठी ‘ओबव्वा आत्म रक्षा कला’ प्रशिक्षणाच्या प्रात्यक्षिकाचा सुवर्णसौध येथे आज शुभारंभ करून ते बोलत होते.

मुख्यमंत्री बोम्मई पुढे म्हणाले, राज्यात गतवर्षी निर्भया योजनेंतर्गत ओबव्वा स्वसंरक्षण कला प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात विद्यार्थिनींना प्रशिक्षण देण्यात आले आहे, त्यामागे महिलांना धैर्याने समाजात जगता यावे हा हेतू आहे. प्रशिक्षित विद्यार्थिनींनी ही कला अन्य चारजणींना शिकवावी. जेणेकरुन ओबव्वा प्रकल्प यशस्वी होईल असे ते म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे सभापती बसवराज होराट्टी, समाजकल्याण मंत्री कोटा श्रीनिवास पुजार, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आदी उपस्थित होते.


Recent Comments