Belagavi

14 तसेच 15 जानेवारी २०२३ रोजी राज्यस्तरीय अंबिगर शरण संस्कृती उत्सव

Share

निजशरण अंबिगर चौडय्या यांच्याजयंतीनिमित्त , हावेरी जिल्ह्यातील नरसीपुर येथे निजशरण अंबिगर चौडय्या गुरुपीठामध्ये , 14 तसेच 15 जानेवारी २०२३ रोजी राज्यस्तरीय अंबिगर शरण संस्कृती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे .

या संदर्भात , बेळगावमधील एका खाजगी हॉटेल मध्ये पत्रकार परिषद घेऊन , समाजच्या स्वामीजींनी याबद्दल माहिती दिली . हावेरी जिल्ह्यातील नरसीपुर येथे निजशरण अंबिगर चौडय्या गुरुपीठामध्ये , 14 तसेच 15 जानेवारी रोजी राज्यस्तरीय अंबिगर शरण संस्कृती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . यावेळी वचनग्रंथ महारथोत्सव , त्याचप्रमाणे लिंगैक्य शांतमणी महास्वामी यांचा पुण्यतिथी उत्सव , त्याचप्रमाणे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे .

प्रथमच या राज्यस्तरीय आंबिगर शरण संस्कृती उत्सवानिमित्त , वीर गणचारी पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला जाणार आहे . 14 जानेवारी 2023 संध्याकाळी हा कार्यक्रम सुरु होणार असून , 15 जानेवारीला संध्याकाळी ह्या कार्यक्रमाची सांगता केली जाणार आहे . या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ,माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या तसेच केंद्रीय आणि राज्य मंत्र्यांसह , राजकीय नेत्यांना निमंत्रित केले जाणार आहे . त्याचप्रमाणे राज्यातील विविध मठाधीशांना देखील निमंत्रित केले असून त्यांचे मोलाचे मार्गदर्शन यावेळी लाभणार आहे . यावेळी नरसीपुर मठाच्या पंचाशाखा सुरु करणार असल्याची माहिती स्वामीजींनी दिली .

45 वर्षांपासून समाजाकडून आरक्षणासाठी लढा सुरु आहे तरीही आमच्या समाजाला एस टी आरक्षण दिले गेले नाही याची खंत स्वामीजींनी व्यक्त केली .

तरी या कार्यक्रमाला समाजबांधवांसह हितचिंतकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ,स्वामीजींनी केले आहे . पत्रकार परिषदेत , समाजाचे नेते उपस्थित होते.

Tags: