Belagavi

आ . सतीश जारकीहोळी यांच्याविरोधात भाजपकडून षडयंत्र : मराठा समाज नेत्यांचा आरोप

Share

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान सतीश जारकीहोळी यांच्या भाषणात व्यत्यय आणून , त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे . यमकनमर्डी मतदारसंघातील मराठा तसेच अन्य जातीधर्माचे लोक हे सह करणार नाही . सतीश जारकीहोळी हे यमकनमर्डी मतदार संघाचे विकासक असून आम्ही सर्व जनता त्यांच्या पाठीशी ठाम उभे आहोत असे यमकनमर्डी मतदार संघातील मराठा समाजाच्या नेत्यांनी ठणकावून सांगितले आहे .

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांच्या नेतृत्वाखाली यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघातील मराठा समाजाच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली .
निवडणुकीच्या काळात त्यांचे नाव कलंकित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

यमकनमर्डी मतदार संघाचा विकास आ . सतीश जारकीहोळींमुळेच झाला आहे . विधानसौधजवळ मराठा समाजाचे जे आंदोलन झाले , त्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी तसेच मराठा समाजाचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आ . सतीश जारकीहोळी त्या ठिकाणी गेले होते .मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात भाजपनेच त्यांच्या भाषणात व्यत्यय आणला. जमखंडी येथील प्रशांत गायकवाड नावाच्या भाजप कार्यकर्त्याने अडवले संघ परिवाराची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीने भाषणात अडथळा आणल्याचा आरोप यावेळी करण्यात आला . बेळगाव मराठा समाजाच्या नेत्यांनी त्या व्यक्तीचा फोटो प्रसिद्ध केला

सतीश जारकीहोळी यांनी यमकनमर्डी मतदारसंघाचा विकास केला आहे . विकास सहन न होणारे काही जण त्यांच्या बोलण्याचा विपर्यास करून अपशब्द पसरवत आहेत . शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी सतीश जारकीहोळी यांनी मदत केली .त्यांचे नाव बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असून भाजप राजकीय स्वार्थासाठी क्षुद्र राजकारण करत आहे. सतीश जारकीहोळी यांच्या विरोधात सातत्याने अपप्रचार सुरू आहेसमस्त मराठा समाज सतीश जारकीहोळी यांच्या पाठीशी असल्याचे नेत्यांनी सांगितले .

यावेळी यमकनमर्डी मतदारसंघातील मराठा समाजाचे नेते उपस्थित होते .

Tags: