Belagavi

परिस्थिती बघून राज्यात मास्कसक्तीचा निर्णय : आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर

Share

राज्यात परिस्थिती पाहून मास्क अनिवार्य करण्यात येणार आहे अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.

सुवर्णसौध येथे शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्र्यांनी मास्क वापरणे एवढ्यात बंधनकारक केलेले नाही, पण तो वापरण्याचा सल्ला आम्ही दिला आहे, पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री मास्क वापरत आहेत.

संसदेत मास्क वापरून त्यांनी आपल्याला आदर्श घालून दिला आहे. संपूर्ण देशाने त्यांचे अनुकरण केले पाहिजे. बूस्टर डोस काही प्रमाणात वाया गेले असावेत, लाखो डोस वाया गेल्याची आपल्याला माहिती नाही. लस काही प्रमाणात वाया जाते. लोकांना लसीकरणावेळी पहिल्या दोन डोसमध्ये रस होता, पण तिसऱ्या डोसमध्ये त्यांना रस नव्हता. कोविड संपला या मानसिकतेत ते आहेत. चीनसह काही देशांमध्ये जे काही चालले आहे ते पाहून मला वाटते की लोक आपणहून पुन्हा लस घेतील असे त्यांनी सांगितले.

एकंदर संसर्ग शक्यता पाहूनच मास्कसक्ती करण्याचे संकेत आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Tags: