आपल्या विविध मागण्याच्या पूर्ततेचा आग्रह करून, कर्नाटक राज्य अंगणवाडी वर्कर्स आणि हेल्पर्स असोसिएशनच्या वतीने , बस्तवाड येथे आंदोलन छेडण्यात आले .
मागील अनेक वर्षांपासून , अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मदतनीस आपल्या मागण्याच्या पूर्ततेसाठी आंदोलन करीत आहेत . मात्र सरकारने त्यांच्या मागण्यांची पूर्तता न केल्याने , या सर्वानी आज पुन्हा अधिवेशन काळात सरकारचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधून त्या पूर्ण व्हाव्यात या दृष्टीने ठिय्या आंदोलन छेडले .

नोकरीत कायम करणे , अंगणवाडी शिक्षिकांना क श्रेणीत तसेच , मदतनीसांनाच समावेश द श्रेणीत करावा त्याचप्रमाणे , सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी , निवृत्ती वेतन तसेच ग्रज्युएटी द्यावी , त्याचप्रमाणे कनिष्ठ वेतन 20500 रुपये द्यावे अशी मागणी , बेळगाव जिल्हा अंगणवाडी वर्कर्स अँड हेल्पर्स असोसिएशनचे अध्यक्ष ऍड . नागेश सातेरी यांनी केली .
त्याचप्रमाणे , संघटनेच्या राज्य सचिव जयम्मा यांनी देखील आपल्या मागण्यांविषयी माहिती दिली .
यावेळी अंगणवाडीच्या शिक्षिका आणि सहाय्यिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या


Recent Comments