लिंगायत पंचमसाली समाजाला 2-ए आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज सुवर्णसौधला घेराव घालण्याचा इशारा देण्यात आलाय. त्यासाठी कुडलसंगम पीठाचे बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली आज पदयात्रेला प्रारंभ करण्यात आलाय. दुपारपर्यंत ही पदयात्रा सुवर्णसौधवर धडकण्याची शक्यता आहे.

सौंदत्ती तालुक्यातील करिकट्टी गावातून पंचमसाली समाजाच्या पदयात्रेला प्रारंभ गुरुवारी सकाळी करण्यात आला. पंचमसाली समाजाला 2-ए प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी समाजातर्फे गेल्या सुमारे पाच वर्षांपासून सतत आंदोलन करण्यात येत आहे. आता ‘करो या मरो’ आंदोलनाची हाक देण्यात आली असून, स्वामीजींनी दिलेला अल्टीमेटम आज संपला. त्यामुळे पंचमसालींचा सुवर्णसौधवर निषेध मोर्चा काढून भव्य शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. करीकट्टीपासून हिरेबागेवाडीमार्गे सुवर्णसौधपर्यंत पदयात्रा काढण्यात येत आहे. बसव जय मृत्युंजय स्वामीजी स्वतः आज या पदयात्रेत 30 किमी चालणार आहेत.


Recent Comments