Athani

काँग्रेसचा पराभव होऊन जेडीएस जिंकेल : माजी आमदार शाहजहान डोंगरगावे

Share

अथणीमध्ये काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये अंतर्गत लढाई सुरू आहे, त्यामुळे काँग्रेसचा पराभव होऊन जेडीएस जिंकेल, काँग्रेसचा पराभव करणे हे माझे ध्येय नाही, असे अथणी येथील माजी आमदार शाहजहान डोंगरगावे यांनी सांगितले.

जेडीएस पक्षात दाखल झालेले माजी आमदार शाहजहान डोंगरगावे यांचे जेडीएस कार्यकर्ते व नेत्यांनी जोरदार स्वागत व सत्कार केला. पत्रकार परिषद घेऊन ते म्हणाले की, अथणी काँग्रेस पक्षात अंतर्गत लढाई सुरू असून वैयक्तिक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काँग्रेसचे नेते पुढे आले आहेत, पक्ष बळकट होत नसल्याने काँग्रेसचा पराभव होणार आहे .

यावेळी माजी आमदार कल्लाप्पा मगेंनावर , जेडीएस ब्लॉक अध्यक्ष अण्णाराय हलल्ली, मल्लिकार्जुन गुंजीगावी, शिवानंद ऐगली, मुरुगेश नाईक आदी उपस्थित होते.

Tags: