Vijayapura

जिल्हा आरोग्य अधिकारी कोण यावरुन वाद :अखेर सुटला तिढा

Share

दारूच्या नशेत दोन डीएचओमध्ये झालेल्या भांडणामुळे एकाच कार्यालयाला दोनदा टाळे ठोकण्यात आले. अधिकृत आरोग्य अधिकारी आणि कार्यवाहक अधिकारी हा प्रश्न एकदाचा आज शेवटी सुटला

विजापूर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दोन अधिका-यांच्या मारहाणीमुळे, डीएचओ कार्यालयाला दोन कुलूप लावण्यात आले . दुसरा डीएचओ मीच खरा आरोग्य अधिकारी आहे असे सांगत होता . काल कार्यवाहक आरोग्य अधिकारी सुरेश चव्हाण यांनी या खुर्चीवर आपला हक्क आहे असे सांगून कुलूप घालून गेले होते तर , माजी आरोग्य अधिकारी राजकुमार यरगल यांनीही कॅटच्या आदेशानुसार मी या डीएचओ खुर्चीचा मास्टर असल्याचे सांगत कार्यालयाच्या दाराला चावी लावली होती. त्यामुळे एकाच चेंबरच्या दाराला दोन कुलुपे लागली होती . त्यामुळे कर्मचाऱ्यांना पेच निर्माण झाला होता. यापूर्वी डीएचओ असलेले राजकुमार यरगल यांची 20 सप्टेंबर रोजी बदली झाली, आणि डॉ. सुरेश चौहान यांची सरकारने नियुक्ती केली होती, राजकुमार यरगल यांनी सरकारच्या बदलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केएटीशी संपर्क साधला होता. 15 डिसेंबर रोजी राजकुमार यरगल याना KAT. (कर्नाटक प्रशासकीय न्यायाधिकरण) निकाल दिला . तरीही, राजकुमार यांचा या खुर्चीसाठी आग्रह सुरूच आहे .

काल बाहेर गेलेले आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश चव्हाण आज नेहमीप्रमाणे कार्यालयात हजर झाले, मी अधिकृत डीएचओ आहे, आम्ही न्यायालयाच्या आदेशाचा आदर करू आणि शासनाच्या आदेशाचे पालन करू. माजी डीएचओ यांनी आयुक्त कार्यालयात जाऊन रुजू व्हावे, ही माझी खुर्ची आहे, त्यामुळेच मी येऊन बसलो आहे, असे सध्याचे डीएचओ डॉ. सुरेश चव्हाण म्हणाले.

काल एकाच चेम्बरला दोन कुलुपे घालण्यात आल्याने , जिल्हाधिकारी आणि CEO साठी ही डोकेदुखी ठरली, पण काल सायंकाळपर्यंत आयुक्त कार्यालयातून आदेश काढण्यात आला आणि डॉ. सुरेश चव्हाण यांनी विजापूरचे डीएचओ म्हणून काम सुरू ठेवावे असे आदेश दिले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Tags: