Belagavi

कोविडबाबत आज बैठक; जनतेने तज्ज्ञांचा सल्ला पाळावा : बोम्मई

Share

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आज दुपारी तीन वाजता होणार आहे. या बैठकीत राज्यात कोविड नियंत्रणासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्याबाबत चर्चा होणार आहे. जनतेने काळजी करू नये. फक्त विशेषज्ञ काय सल्ला देतात तो पाळा असे आवाहन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले.

कोविडच्या संभाव्य लातेसंदर्भात आज गुरुवारी सुवर्णसौध येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, आजच्या बैठकीत विशेषत: बूस्टर डोससाठी विशेष कार्यक्रम करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. जनतेने घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र विशेषज्ञांनी दिलेला सल्ला पाळला पाहिजे.

 

Tags: