कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचा महाराष्ट्र विधानसभेत अपमान झाला हे खेदजनक असल्याचे काँग्रेसचे आमदार यु टी खादर यांनी सांगितले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना,काँग्रेसचे आमदार यु टी खादर यांनी सांगितले कि , महाराष्ट्राचे मंत्री आणि आमदार आमच्या मुख्यमंत्र्यांबद्दल हलके बोलले हे खेदजनक आहे, कन्नडिगांना असे बोलणे योग्य नाही, कर्नाटक सरकारने सडेतोड उत्तर द्यावे, आम्ही काँग्रेस पक्ष राज्य सरकारला पूर्ण पाठिंबा देतो. राज्याचे खासदार गप्प का आहेत, केंद्र सरकारवर दबाव आणायला हवा.महाराष्ट्र आणि केंद्रात भारतीय जनता पक्षाविरोधात त्यांनी जोरदार संताप व्यक्त केला .


Recent Comments