Belagavi

400 कामगारांची बेकायदेशीर बदली घ्यावी मागे : टाटा मार्कोपोलो क्रांतिकारी संघटनेचे आंदोलन

Share

लखनौ युनिटमध्ये 400 हून अधिक कामगारांची बेकायदेशीर आणि अनधिकृतपणे केलेली बदली मागे घेण्यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी , टाटा मार्कोपोलो क्रांतिकारी संघटनेने बस्तवाडजवळ आंदोलन केले.

कंपनीने 27 कामगारांच्या निलंबनाची कारवाई टाळावी. कारखान्याच्या कामात कामगारांना होणारा रोजचा छळ आणि मानसिक छळ टाळावा आणि कामगार विरोधी आणि अधिकाराच्या दुरुपयोगाची चौकशी करण्यासाठी कामगार विभागाचे अतिरिक्त कामगार आयुक्त मंजुनाथ जी यांना निलंबित करण्यात यावे असा आग्रह यावेळी करण्यात आला .
यावेळी गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी या कामगारांच्या निवेदनाचा स्वीकार केला आणि त्यांची मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवण्याचे आश्वासन दिले .

मल्लिकार्जुन मरम्मनवर, सिद्धगौडा पाटील, के.बी.गोनाळ, शिवयोगी हालभावी , विरेश पाटील, भीमा शंकर पुजारी आदी उपस्थित होते.

Tags: