Belagavi

श्री संत गाडगेबाबा यांची 66 वी पुण्यतिथी : बेळगावच्या मराठा रजक समाजाकडून आयोजन

Share

बेळगावच्या मराठा रजक समाजाच्या वतीने श्री संत गाडगेबाबा यांच्या 66 व्या पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले होते .

दरवर्षीप्रमाणे , बेळगाव शहरातील ,हुलबत्ते कॉलनी येथील श्री गाडगेबाबा भवनामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून , तसेच श्री गाडगेबाबांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून , कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . सकाळी दहा वाजता स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते .

कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ते , रमेश जाधव यांनी आपले गाडगेबाबा आणि त्यांच्या स्वच्छतेच्या अभियानाविषयी विचार मांडले . त्याचप्रमाणे गाडगेबाबांच्या स्वच्छतेच्या मार्गावर चालून, समाजाला पर्यायाने संपूर्ण मानवजातीला निरोगी ठेवूया असे ते म्हणाले . यावेळी समाजसेवक सुरेंद्र अनगोळकर यांचा सत्कार करण्यात आला .

यावेळी राजू जाधव, विठ्ठल पालेकर , मयूर चव्हाण , राजू यादव , सदानंद साळूंके, आनंद परीट , तसेच समाजातील बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

Tags: