जुनी व्यवस्था बदलून बदल घडवून आणण्याची आमची कटिबद्धता असून, गोंधळी समाजानेही सर्वांगीण प्रगती पाहिली पाहिजे.असे केपीसीसीचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी म्हणाले.
अखिल कर्नाटक गोंधळी समाजाच्या विविध मागण्या राज्य सरकारने पूर्ण कराव्यात, यासाठी शहरातील सुवर्ण विधानसौध परिसरात आयोजित केलेल्या धरणे आंदोलनाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते.

गोंधळी समाजातील सर्व मुलांनी शिक्षण घेतले पाहिजे. सरकारी सुविधांचा उपयोग झाला पाहिजे. राज्य सरकारने विविध मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी आता समाज बांधव आंदोलन करत असून तुमच्या संघर्षाला आमचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी चिक्कोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, बेळगाव ग्रामीण काँग्रेस महिला युनिटच्या अध्यक्षा कल्पना जोशी यांच्यासह गोंधळी समाजाचे नेते उपस्थित होते.


Recent Comments