कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे अशक्त मुख्यमंत्री आहेत अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केली.
सुवर्णसौधसमोर बुधवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही सरकारांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊनही सीमाभागात संघर्ष झाला आहे. बोम्मई यांच्या शब्दाला किंमत दिलेली नाही. बैठकीत त्यांनी ठामपणे बोलायला हवे होते. कर्नाटक, महाराष्ट्र आणि केंद्रात ट्रिपल इंजिनचे सरकार आहे पण त्याचा काही उपयोग नाही, पाणी, जमीन आणि भाषेच्या मुद्द्यावर आपण सर्व एक होऊ, सीमाप्रश्नावर महाजन अहवाल अंतिम आहे हीच आमची भूमिका आहे असे ते म्हणाले.


Recent Comments