Kagawad

सम्मेद शिखरचे राखावे पावित्र्य : पर्यटन स्थळाचा दर्जा करावा रद्द

Share

नांदणी जैन मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक स्वामीजी यांच्या उपस्थितीत कागवड तालुक्यातील समस्त जैन समाजाच्या वतीने कागवड शहरात ठिय्या आंदोलन करून गिरीडी जिल्ह्यातील जैनांचे पवित्र प्राचीन स्थान असलेल्या श्री सम्मेद शिखरजी क्षेत्राला संरक्षण देण्याची मागणी केली .

कागवड शहरातील आचार्य विद्यासागर शैक्षणिक संस्थेच्या सभागृहात बुधवारी सकाळी तालुक्यातील सुमारे पाच हजार जैन भाविक जमले होते . स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक स्वामीजी व जैन समाजाच्या नेत्यांनी सम्मेद शिखरजींची सविस्तर माहिती दिली. नांदणी जैन मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक स्वामीजी म्हणाले, जैनांचे समाजासाठी मोठे योगदान आहे, ते अहिंसेचे तत्व अनादी काळापासून शिकवत आले आहेत. श्री सम्मेद शिखरजी हे सर्वात पवित्र आणि प्राचीन स्थान आहे जिथे या तत्वज्ञानाचा उपदेश करणार्या 24 पैकी 20 तीथरंकरांना त्यांच्या महान ऋषीमुनींसह मोक्ष मिळाला. मात्र तेथील पर्यटन विभागाने हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यास परवानगी दिली आहे. हे क्षेत्र अपवित्र बनणार आहे कारण यामुळे मौजमजा करण्याची संधी मिळणार आहे. भारतातील एकूण कराच्या 24 टक्के रक्कम जैन समाज बांधवांकडून देशासाठी जमा होत असल्याने हा आदेश मागे घेण्याची मागणी झारखंड सरकारला केली . देशाच्या पंतप्रधानांनी हे विसरू नये, असेही ते म्हणाले.

यावेळी कागवाड तालुक्यातील जैन समाजाचे नेते, शितलगौडा पाटील, ऐनापूरचे प्रसिद्ध वकील संजय कुचनुरे, कागवाड जैन समाजाचे अध्यक्ष तात्यासाहेब धोत्रे , वकील अभयकुमार अकिवाटे, सुरेश चौघुले, अभिषेक चौघुले, शितल चौगुले आदींची भाषणे झाली. जैन धर्माचे पवित्र स्थान सम्मेद शिखरजीचे पर्यटन स्थळात रूपांतर करण्याचा झारखंड सरकारचा आदेश निंदनीय आहे असे सांगून जैन समाजाच्या संयमाची परीक्षा घेऊ नका. गिरनार मंदिरात यापूर्वीही अतिक्रमणे झाली आहेत. आता तुम्ही सम्मेद शिखरजींबद्दल समाजाविरुद्ध ठराव करत आहात, त्याचा परिणाम योग्य होणार नाही. केंद्र सरकारने तात्काळ आपली भूमिका बदलून सम्मेदाशिखरजींना पर्यटनस्थळातून मुक्त करावे, असे सांगून हा निर्णय न बदलल्यास आगामी काळात तीव्र संघर्ष छेडण्यात येईल, असेही ते म्हणाले.

हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्रासह इतर राज्यांतील खासदारांनी या विषयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून ठराव मागे घेण्यास सांगितले आहे. मात्र कर्नाटक राज्याचे खासदार समाधानी नाहीत. तसेच चिक्कोडीच्या खासदारांनी त्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जैन समाज बांधव असून या विषयावर अधिवेशनात चर्चा करून येथील जनतेच्या मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी पंतप्रधानांना केली.

या आंदोलनात अनेक महिला श्राविकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. तसेच या निर्णयामुळे आपला समाज आणि धर्म दुखावला गेला आहे. त्यासाठी कागवड तहसीलदार कार्यालयाचे नायब तहसीलदार अण्णासाहेब कोरे यांनी पंतप्रधान व राष्ट्रपतींना निवेदन देऊन जाखरंद शासनाने तात्काळ निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली.
कागवाड लिंगायत समाजाच्या वतीने समाजाचे नेते व पीकेपीएस संघटनेचे अध्यक्ष ज्योतिकुमार पाटील यांनी जैन समाजाच्या तीर्थक्षेत्राच्या सम्मेद शिखरजी प्रकरणाच्या निषेधार्थ जैन समाजाची मागणी केंद्र सरकारकडे पूर्ण करण्याची मागणी करून पाठिंबा व्यक्त केला.

कागवडा तालुक्यातील जैन समाजाचे नेते विजय आकीवाटे , आदिनाथ दानोळी , यशवंत पाटील, बाहुबली कुसनाळे, भूषण पाटील, अरुण गणेशवाडी, जयपाल येरंडोळे, अण्णासाहेब कड्डू, पदमकुमार आलपनवर, अप्पासाहेब चौघुले, राहुल देव पाटील, विपुल देव पाटील, सर्वश्री देवराव पाटील आदी उपस्थित होते. तालुक्यातील सुमारे पाच हजार लोक आंदोलनात सहभागी झाले होते. या सर्व आंदोलकांना कागवाडच्या विद्यासागर शैक्षणिक संस्थेने मदत केली.

Tags:

jain-protest-for-shri-sammedh-shikharji/