बेळगावातील कोंडासकोप्पजवळ , शेतकरी नेते एच आर बसवराजप्पा यांच्या नेतृत्वाखालीआंदोलन सुरु आहे . आंदोलनादरम्यान शेतकरी नेत्या मंजुळा पुजारी यांनी आंदोलनस्थळी गोंधळ घातला.
बेळगावातील कोंडासकोप्पजवळ शेतकरी नेते एच आर बसवराजप्पा यांच्या नेतृत्वाखालीआंदोलन सुरु आहे . मात्र आंदोलनस्थळी , मंजुळा पुजारी यांना व्यासपीठावर येण्यास बसवराजप्पा यांच्या समर्थकांनी आक्षेप घेतल्याने संतप्त झालेल्या शेतकर्यांना मंजुळा पुजारी यांच्या समर्थकांनी प्रश्न केला. यावेळी शेतकरी नेते बसवराजप्पा आणि मंजुळा पुजारी यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली .

व्यासपीठावर येऊ न दिल्याने संतप्त शेतकरी नेत्या मंजुळा पुजारी या आंदोलन स्थळावरून तडक बाहेर पडल्या.
मंजुळा पुजारी यांनी आपल्या समर्थकांसह आंदोलन स्थळावरून बाहेर पडताना सांगितले की, मी स्वतंत्रपणे आंदोलन करणार आहे. शेतकऱ्यांसाठी मी रस्त्यावर बसून लढेन .


Recent Comments