ईडी आणि सीबीआय या भाजपच्या कळसूत्री बाहुल्या असून, ते भाजपचे निवडणूक विभाग बनले आहेत, भाजपच्या विरोधात असलेल्यांना त्रास देणे हे त्यांचे काम झाले आहे अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते बी. के. हरीप्रसाद यांनी केली.
सुवर्णसौध येथे आज मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना हरीप्रसाद यांनी, केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या शिक्षण संस्थांवर सीबीआयने टाकलेल्या छाप्याबद्दल संताप व्यक्त केला.
सावरकरांच्या फोटोबद्दल बोलताना, स्वातंत्र्यलढ्याच्या विरोधात असलेल्या आणि 6 वेळा ब्रिटिशांना माफीनामा पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचे चित्र विधिमंडळात लावणे कितपत योग्य आहे, त्यांच्याबद्दल डीकेशी आणि सिद्धरामय्या या दोघांचे विधान योग्य आहे. त्यांच्या विधानाचा विपर्यास करण्याचा प्रयत्न होता कामा नये असे त्यांनी सांगितले.


Recent Comments