सरकार एक समिती स्थापन करून अहवाल अधिसूचित करणार आहे . अहवाल दिल्यानंतर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असे पंचमसाली आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री बोम्मई यांनी पत्रकारांना आपली प्रतिक्रिया दिली .
ते आज विधानसौधबाहेर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते . पंचमसाली समाजाला २ ए आरक्षण देण्याचा मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले कि , सरकारने एक समिती स्थापन करू अहवाल अधिसूचित केला आहे . अहवाल दिल्यानंतर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल .
जारकीहोळी प्रकरणानंतर ईश्वरप्पा मंत्रिमंडळात येण्याचा विचार करीत आहेत या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले कि काही मुद्द्यांवर उघड चर्चा करता येत नाही . त्याच्याशी वैयक्तिक बोला .
डी के शिवकुमार यांच्यावर सीबीआय ने छापा घोट्याळ्याच्या प्रकरणी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले कि ,सीबीआय ही एक स्वतंत्र संस्था आहे . डी के शिवकुमार यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येत आहे . शिवकुमार यांनादेखील हे माहित आहे . हलाल विधेयकासंदर्भात माध्यमांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले कि , हलाल विषयातून बाहेर पडा.
हलाल विषय माझ्यासमोर नाही . हलाल विषयाशी काहीच संबंध नाही असे ते म्हणाले .


Recent Comments