स्मशानभूमीतील विहिरीत अज्ञात बाळाचा मृतदेह सापडल्याची घटना विजापुरात उघडकीस आली आहे.
विजापूर शहरातील देवगिरी स्मशानभूमीच्या विहिरीत अज्ञात बाळाचा मृतदेह सापडला. विहिरीतील मोटार सुरू करण्यासाठी कामगार गेला असता, हा प्रकार उघडकीस आला. अंदाजे 8 ते 9 महिन्यांच्या बाळाचा मृतदेह आढळून आला. आदर्श नगर पोलीस ठाण्याच्या पीएसआयनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ही घटना आदर्श नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुलाच्या पालकांचा शोध घेण्यात येत आहे.


Recent Comments