बेळगावच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशीच्या कामकाजावेळी , राज्यातील दिवंगत नेत्याना श्रद्धांजली वाहून सदनाचे कामकाज मंगळवारी सकाळपर्यंत पुढे ढकलण्यात आले .
बेळगावमध्ये आज 15 व्या विधानसभेचे 14 वे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे . संपूर्ण कर्नाटक शासन आजपासून बेळगावमध्ये आले आहे . या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच्या सदनाच्या कामकाजावेळी , श्रद्धांजली प्रस्ताव मांडण्यात आला . यावेळी सत्ताधारी भाजप तसेच विरोधी पक्षातील दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली . विधानसभेचे उपसभापती आनंद मामनी , उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव , मंत्री उमेश कत्ती तसेच अन्य दिवंगत नेत्यांना सदनामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली .
यावेळी या दिवंगत नेत्यांबद्दल सदनात उपस्थित असलेल्या नेत्यांनी आपल्या आठवणी सांगितल्या


Recent Comments