वादग्रस्त कृषी कायदे मागे घ्यावेत, उसाला एमएसपी दर निश्चित करावा आदी मागण्यांसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या वतीने आज कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली सुवर्णसौधसमोर निदर्शने करण्यात आली.
कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली बेळगावातील सुवर्णसौधजवळील बस्तवाड येथे निदर्शने करण्यात आली. वादग्रस्त कृषी कायदे मागे घ्यावेत, उसाला एमएसपी दर निश्चित करावा आदी मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात आली. सरकारने पुन्हा पुन्हा खोटे बोलणे बंद केले पाहिजे. भारत सरकारने वादग्रस्त कृषी कायदे बिनशर्त मागे घेतले आहेत. त्याचप्रमाणे राज्य सरकारनेही हे वादग्रस्त कायदे मागे घ्यावेत अशी मागणी यावेळी कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी केली.
उसाला एफआरपीहून कमी दर दिल्यास कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद असल्याची अधिसूचना सरकार जारी करते, पण दुसरीकडे कमी दर देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करत नाही हा कुठला न्याय असा सवाल करून मुख्यमंत्रीसुद्धा अशा कारखान्यांवर कारवाई करता येत नाही अशी हतबलता दर्शवितात. मग सरकार काय कामाचे असा प्रश्न त्यांनी केला.
बेंगळुरमध्ये विधानसभा अधिवेशन झाले, आता बेळगावचे अधिवेशन सुरु आहे. तरीही सरकार काहीच कारवाई करत नाही यामागचा हेतू काय? कर्नाटक राज्यात भाजपचा अजेंडा पूर्णपणे राबवायचा असेल तर मला सांगा. निवडणुका जवळ आल्या आहेत, आम्ही निर्णय घेऊ. अन्यथा आमच्याकडेही इच्छाशक्ती आहे. वादग्रस्त कृषी कायदे या अधिवेशनातच मागे घ्यावेत ही आमची मागणी आहे. ती मान्य न झाल्यास निवडणूक रिंगणात उतरून सरकारला धडा शिकवू असा इशारा कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी आपली मराठीसोबत बोलताना दिला आहे.
एकंदर, आधी इशारा दिल्याप्रमाणे कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली रयत संघाने अधिवेशन काळातच राज्य सरकारच्या विरोधात शड्डू ठोकला आहे.


Recent Comments