Belagavi

कोगनोळी चेकपोस्टवर महाविकास आघाडीचे आंदोलन : शेकडो कार्यकर्त्यांचा बेळगावच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न

Share

बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळाव्याला परवानगी नाकारून , समिती नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड करून त्यांना स्थानकाबद्ध केल्याच्या पार्श्वभूमीवर , महाराष्ट्र
महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी बेळगावच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करीत , कोगनोळी चेकपोस्ट जवळ जोरदार निदर्शने केली .

बेळगावमध्ये कर्नाटक हिवाळी अधिवेशनाला विरोध दर्शवण्यासाठी आणि आपली महाराष्ट्रात जाण्याची इच्छा दर्शवण्यासाठी , महाराष्ट्र एकीकरण समितीने दरवर्षीप्रमाणे यंदाही महामेळाव्याचे आयोजन केले होते . मात्र मेळाव्याच्या ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू केल्याने , हा मेळावा रद्द झाला . समिती नेते आणि कार्यकर्ते यांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले . हे काळातच महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी , बेळगावच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला . निप्पाणी तालुक्यातील कोगनोल्ली चेकपोस्टवर शेकडो कार्यकर्ते शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांचे झेंडे घेऊन आले होते.

यावेळी बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा दिल्या . कोगनोळी चेकपोस्टच्या दोन्ही बाजूस महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता . हे कार्यकर्ते आक्रमक होण्याआधी त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरु होते . मात्र तरीही हे कार्यकर्ते बेळगावमध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत होते . या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्ग 4 वर वाहतूक कोंडी झाली होती .

पोलिसांनी अडवल्याने राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर दूधगंगा नदीच्या पुलावर उभे राहून भाषण केले . कर्नाटकचा सीमावर्ती भाग महाराष्ट्रात सामील झाला पाहिजे, कर्नाटकातील सीमाभागातील मराठी बांधवांवरील अत्याचार आम्ही सहन करणार नाही , महाराष्ट सदैव त्यांच्या पाठीशी आहे असे ते म्हणाले .
महाविकास आघाडीच्या 500 हुन अधिक कार्यकर्त्यांनी यावेळी कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली .

Tags: