Belagavi

आरक्षण दिले तर विजयोत्सव अन्यथा तीव्र आंदोलन : कुडलसंगम जगद्गुरू

Share

पंचमसाली समाजाला 2 ए आरक्षण देण्यासाठी सरकारला 19 डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. सरकारने आरक्षण दिले तर विजयोत्सव साजरा करू अन्यथा 22 डिसेंबर रोजी सुवर्ण विधान सौधला घेराव घालण्यात येईल असा इशारा कुडलसंगम पंचमसाली पीठाचे जगद्गुरू बसवजय मृत्युंजय स्वामीजींनी दिला आहे .

बेळगावमध्ये आज पत्रकार परिषद घेऊन , कुडलसंगम पंचमसाली पीठाचे जगद्गुरू बसवजय मृत्युंजय स्वामीजींनी सांगितले कि , आम्ही दोन वर्षांपासून लढत आहोत. सीएम बोम्मई याना , उद्या 19 डिसेंबर रोजी होणाऱ्या सरकारी अधिवेशनात याबाबतची घोषणा करण्यासाठी मुदत दिली होती . बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाची घोषणा करतात कि न्हाई हे पाहून आम्ही आंदोलनाची दिशा ठरवू . 22 डिसेंबर रोजी आम्ही सुवर्ण सौधजवळ विराट पंचशक्ती मेळावा घेणार आहोत . उद्या सवदत्ती मतदार संघात पंचमसाली आरक्षण विराट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या अधिवेशनात आरक्षण दिले तर कसे साजरे करायचे हे ठरवले जाणार आहे . आणि आरक्षण न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा स्पष्ट निर्धार त्यांनी केला आहे सवदत्ती ते सुवर्ण विधान सौधपर्यंत पंचलक्ष पदयात्रा काढणार आहोत . या पदयात्रेद्वारे , सुवर्णसौधला घेराव घालणार आहोत .

सवदत्ती येथील मेळाव्याची सायंकाळी ७ वाजता स्मृती सभेची सांगता होईल तोपर्यंत शासनाचा निर्णय कळेल . सरकारच्या निर्णयावर आंदोलनाची दिशा ठरेल . सरकारच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही सुवर्णसौध येथे विराट मेळाव्याचे आयोजन केले आहे. विराट मेळाव्यासाठी , शंभर एकर परिसरात सर्व तयारी सुरू आहे पंचमसाली शक्ती प्रदर्शनासाठी येणारे स्वतः आपली भाकरी बांधून घेऊन येणार आहेत . येडियुराप्पानी दिलेले आश्वासन खोटे ठरल्याने , आम्ही बागलकोट ते बेंगळुरपर्यंत पदयात्रा केली . पण आता हे आंदोलन अंतिम असेल .
बसवनगौडा पाटील यांनी देखील या लढ्याला पाठिंबा दिला आहे.  या पत्रकार परिषदेत पंचमसाली समाजाचे नेते उपस्थित होते .

Tags: