राज्याच्या साखरमंत्र्यांचे वक्तव्य हास्यास्पद असल्याची टीका रयत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ कोडीहल्ली चंद्रशेखर यांनी केली .
गोकाक येथे पत्रकार परिषदेत बोलताना शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ कोडीहल्ली चंद्रशेखर यांनी सांगितले कि , सरकारने प्रत्येक जिल्ह्यासाठी समान पॅटर्न अवलंबणे थांबवावे , बागलकोट भागांतील कारखान्यांकडून किती टन ऊस केले आहे किती टन साखरेचे उत्पादन होते याची माहिती शासनाच्या प्रशासकीय यंत्रणेला नाही. इथेनॉलमधील लाभांश आम्ही शेतकऱ्यांना देतो असे सांगितले जाते मात्र प्रत्यक्षात तो दिला जात नाही अशी कडवट प्रतिक्रिया त्यांनी दिली .
शेतकऱ्यांच्या संघर्षामुळे केंद्र सरकारने लागू केलेला कृषी कायदा बिनशर्त मागे घेण्यात आला असला तरी राज्य सरकारने माघार न घेता विकासकामे करत आहेत.हे थांबवायला हवे. ऊस पिकासाठी एफआरपी जाहीर केला . SAP ताबडतोब जारी करावा. आणि शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यावीत, अशी मागणी बेळगावमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 19 डिसेंबरला आमच्या संघटनेकडून सुवर्णसौधला घेराव घालण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेत रयत संघाचे राज्य सचिव भक्तरल्ली भैरेगौडा , मालतेश पुजार, तालुकाध्यक्ष रमेश गुदिगोप्प, उपाध्यक्ष रायप्पा गौडप्पण्णावर, संघटन सचिव उमेश नायक उपस्थित होते.


Recent Comments