Belagavi

टॅक्स प्रॅक्टिशनर्ससाठी बेळगावमध्ये सेमिनार : जीएसटीआर 9 तसेच जीएसटी 9 सी विषयी मार्गदर्शन

Share

बेळगावमधील टॅक्स प्रॅक्टिशनर्स साठी , जीएसटीआर 9 तसेच जीएसटी 9 सी विषयी आयोजित चर्चासत्रात , प्रमुख पाहुण्या यास्मीनबेगम वालीकार यांनी महत्वपूर्ण विषयांवर माहिती दिली .

शनिवारी , कर्नाटक स्टेट टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन बेंगळूर तसेच बेळगाव , धारवाड , गदग , टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन बेळगाव विभाग यांच्या सहकार्याने , टिळकवाडीतील गोगटे कॉलेज कम्पाउंडमधील के के वेणुगोपाल हॉल येथे , या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते .

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ,सी. ए . विनय कुलकर्णी उपस्थित होते तर सन्माननीय पाहुणे म्हणून , यास्मिनबेगम वालीकर , रमेश बाबू एम जे उपस्थित होते .
यावेळी मार्गदर्शन करताना यास्मीनबेगम वालीकर यांनी जीएसटीआर आणि जीएसटी याबद्दल माहिती दिली . या कायद्यातील तरतुदी तसेच अंमलबाजवणी त्याचप्रमाणे , जीएसटी कर भरणा आणि सवलत याबद्दल उपस्थिताना माहिती दिली.

यावेळी , अरविंद लिंबिकायी मुकुंद पोतनीस , एस जी सोलरगोप्प, रवींद्र शेट्टी , एस आर पाटील , यांच्यासह , बेळगाव , गदग , धारवाड येथील टॅक्स प्रॅक्टिशनर्स उपस्थित होते .

Tags: