बेळगावात होणार्या 10 दिवसीय हिवाळी अधिवेशनाच्या सुरक्षेसाठी सुमारे 4931 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आल्याची घोषणा शहर पोलिस विभागाने केली आहे.
सहा एसपी, 11 अतिरिक्त एसपी, 43 डीएसपी, 95 सीपीआय, 241 पीएसआय, 298 एएसआय, 298 एएसआय, 2829 हेड कॉन्स्टेबल, 800 केएसआरपी तुकडी, 170 क्यूआरटी, 35 गरूड एएससी टीम, 100 व्हॉईर लाईज स्टाफ, 100 होमगार्ड सुमारे 4931 बेळगावच्या हिवाळी अधिवेशनात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आले आहेत. जिल्ह्याबाहेरून आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची राहण्याची व जेवणाची सर्व व्यवस्था शहर पोलिस विभागाने केली आहे.

तसेच 12 अग्निशमन दल, 16 रुग्णवाहिका, 1 गरूड पथक , 60 KSRTC बसेस, 26 चेकपोस्ट बांधण्यात आले आहेत. एवढेच नाही तर बेळगाव हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत सुवर्ण विधान सौध परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त डॉ . एम बी बोरलिंगय्या यांनी दिली .

एकंदर बेळगावमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनसाठी बेळगाव जिल्हा पोलीस तसेच आयुक्तालयाच्या वतीने सर्व प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे .


Recent Comments