Belagavi

एनपीएस पेन्शन विरोधात फ्रीडम पार्क वर आंदोलन

Share

एनपीएस पेन्शन विरोधात 19 डिसेंबरला ,बंगळूर येथील फ्रीडम पार्क मैदानावर ,आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहित , एनपीएस संघाचे जिल्हाध्यक्ष एन टी लोकेश यांनी दिली .

जुनी पेन्शन योजना ओपीएस पुन्हा लागू करावी अशी फार वर्षांपासूनची मागणी आहे . मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे .त्यामुळे आपली मागणी पूर्ण होईपर्यंत , बेंगळूर येथील फ्रीडम पार्क मैदानावर १९ डिसेंबर पासून बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष एन टी लोकेश यांनी शनिवारी , बेळगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली .
ते म्हणाले कि , आम्हाला नवीन पेन्शन योजनेची गरज नाही .

आम्हाला ती जुनी ओपीएस पेन्शन योजनाच लागू करावी यासाठी सातत्याने सरकारकडे मागणी करीत आहोत . मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे . त्यामुळे आम्ही फ्रीडम पार्क येथे लढा देणार आहोत . 19 डिसेंबरला प्रत्येक तालुका आणि जिल्हा मुख्यालयातून या लढ्यासाठी कर्मचारी येणार आहेत . जो पर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत संघर्ष थांबणार नाही . यासाठी आम्हाला शासनाच्या 38 विभागातील कर्मचाऱ्यांचा पाठिंबा आहे . सरकारने आम्ही लढा पुकारण्याआधी ओपीएस पेन्शन योजना लागू करावी असे ते म्हणाले .

यावेळी श्रीधर सरदार , के एम नदाफ , आणि इतर यावेळी उपस्थित होते .

Tags: