बेळगावातील बबन भोबे मित्रमंडळातर्फे समृद्धी फौंडेशन आश्रम आणि बुढापा घर यांना मोफत स्वेटर्स वाटप करण्यात आले.
गोंधळी गल्लीतील श्री दत्त मंदिरासमोर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात गल्लीचे ज्येष्ठ पंच शंकर पावशे आणि ऍड. भाविमनी यांच्याहस्ते स्वेटर्स वाटप करण्यात आले. यावेळी सुरेश शिंदे, बाळू कदम, शंकर कुरणे, सुहास शिंदे, संतोष शिंदे, रामा नांगले उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष बबन भोबे यांनी आभार मानले.


Recent Comments