Belagavi

विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी एनएसयूआयतर्फे बेळगावात आंदोलन

Share

गेल्या 8 महिन्यांपासून पदवी परीक्षांचे निकाल जाहीर न करणाऱ्या विद्यापीठांचा निषेध करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली बेळगावात आज आंदोलन छेडण्यात आले.

8 महिने उलटूनही पदवी परीक्षांचे निकाल जाहीर न करणाऱ्या विद्यापीठांचा निषेध करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने आज राज्यव्यापी आंदोलन केले. आज राज्यातील सर्व विद्यापीठे आणि पदवी महाविद्यालये बंद ठेवून निषेध करण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून बेळगावात आज शनिवारी बेळगावातही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. एनईपी अभ्यासक्रम रद्द करावा, शिष्यवृत्ती, वसतिगृह, मोफत बस पाससह अन्य शैक्षणिक सुविधा त्वरित द्याव्यात आदी अनेकविध मागण्यांसाठी चन्नम्मा चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी विध्यार्थ्यानी जोरदार घोषणाबाजी केली.

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष संगनगौडा पाटील यांनी सांगितले की, विध्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी एनएसयूआयने आज राज्यभरातील शाळा-महाविद्यालये बंदची हाक दिली आहे. राज्य सरकार विध्यार्थी विरोधी धोरण अवलंबत आहे. त्याचा फटका शहरी आणि ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना होत आहे. ग्रामीण भागात पुरेशी बससेवा नाही. बसपास आणि शिष्यवृत्ती न दिल्याने ग्रामीण भागातील गरीब विध्यार्थ्यांना शिक्षण सोडून घरी बसावे लागत आहे. पदवीच्या वर्गाच्या परीक्षांचे निकाल ८ महिने होऊनही न लावल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य संकटात सापडले आहे. याच्या निषेधार्थ आणि सरकारला जाग आणण्यासाठी राज्यभरात आज एसयूआयने आंदोलन छेडले असून त्याला बेळगावसह सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील चन्नम्मा सर्कल आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर एनएसयूआयतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. विविध शाळा-महाविद्यालयांचे 200 हून अधिक विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते.

Tags: