Belagavi

ई सायकल बाईक शेअरिंग व्यवस्थेचे आ . अनिल बेनके यांच्याहस्ते उदघाटन

Share

बेळगाव उत्तर मतदार संघामध्ये , बेळगावमधली पहिली पब्लिक ई सायकल बाईक शेअरिंग व्यवस्था साकारली आहे. आज शनिवारी , चन्नमा सर्कल येथे या व्यवस्थेचे आ. अनिल बेनके यांनी जिल्हाधिकारी नितीश पाटील तसेच स्मार्ट सिटीचे एमडी प्रवीण बागेवाडी यांच्या उपस्थितीत उदघाटन केले .

वेळ, पैसे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या हेतूने आणि स्वास्थ्यही राखता येईल यासाठी पब्लिक ई सायकल बाईक शेअरिंग व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. बेळगावात प्रथमच अशा अनोख्या यंत्रणेची सुरुवात करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी चन्नमा सर्कल येथे आ . अनिल बेनके यांनी या प्रणालीचे उदघाटन केले.

या संदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना आ. अनिल बेनके म्हणाले,यांनी बेळगाव मधील गरीब जनतेला उपयुक्त अशी ही प्रणाली आहे . सर्वानी याचा सदुपयोग करून घ्यावा . यामुळे पेट्रोल तर वाचेल शिवाय प्रदूषण देखील होणार नाही.

जिल्हाधिकारी डॉ नितीश पाटील यांनी या प्रणालीची माहिती देताना सांगितले कि , बेळगाव शहरात प्रथमच , पब्लिक बायसिकल, ई बायसिकल आणि ई बाईक शेअरिंग सिस्टीम व्यवस्था सुरु करण्यात आली असून नागरिकांना माफक दरात सायकली भाड्याने मिळण्याची व्यवस्था केली आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघात अशी सुमारे 20 स्टेशन्स सुरु करण्यात आली आहेत. तेथे ई पेमेंट पद्धतीने भाडे भरण्याची सुविधा आहे. भाड्याचे दरपत्रकही लावलेली आहेत. पब्लिक बायसिकल, ई बायसिकल आणि ई बाईक या तिन्ही प्रकारच्या प्रत्येकी 100 म्हणजेच एकूण 300 ई बाईक असून,. पर्यावरणाचे रक्षण करण्यासह वेळ आणि पैसे वाचविण्यासाठी याची नागरिकांना मदत होईल.सुवर्णसौध जवळ देखील ही सुविधा देण्यात आली आहे . नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी स्मार्ट सिटीचे एमडी प्रवीण बागेवाडी , माजी आ . संजय पाटील , मुरघेन्द्रगौडा पाटील तसेच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते .

Tags: