Belagavi

कर्नाटक राज्य कायदा विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेत राजा लखमगौडा कायदा महाविद्यालयाचा तिसरा क्रमांक

Share

बंगळुरू येथील रामय्या कॉलेज ऑफ लॉ येथे कर्नाटक राज्य कायदा विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये केएलएस राजा लखम गौडा कायदा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी फुटबॉल स्पर्धेत तृतीय पारितोषिक पटकावले. संपूर्ण कर्नाटकातील 18 हून अधिक संघांनी सहभाग घेतला.

राजा लखम गौडा विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी तेजस इंचल, अमोल शिंदे, शुभम कुसलापुर, दुर्गाप्रसाद पाटील, तुषार पवार, आकाश सरदेशपांडे, सई मजूकर, वृषभ लेंगडे, पुरुषोत्तम वडेयर, रवीतेज हिरेमठ, रणछोड शहापूरकर, चाणक्य सोमनवर, मतिन पीरजादे, तुषार चव्हाण पाटील, आर्यन बागी हे फुटबॉल संघाचे खेळाडू आहेत.

कर्नाटक लॉ सोसायटीचे अध्यक्ष अनंत मंडगी, अध्यक्ष पी. एस. सावकर, राजा लखम गौडा लॉ कॉलेज बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष एम. आर. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. ए.एच. हवालदार, जिमखाना अध्यक्ष डॉ. प्रसन्न कुमार, संचालक प्रा. अमित जाधव, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

Tags: