विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्ग 50 रोखून धरून , आंदोलन करण्यात आले. कर्नाटक राज्य शेतकरी आणि हरित सेना यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्ग 50 रोखण्याची घटना विजापूर जिल्ह्यातील निडगुंदी शहरात घडली.
कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय पुजार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 रोखून धरल्यामुळे , वाहनांच्या दुतर्फ़ा लांबचा लांब रांगा लागल्या होत्या . एक तासाहून अधिक काळ महामार्ग रोखून शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला. निडगुंदीचे तहसीलदार अनिलकुमार ढवळगी याना आंदोलनाची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले . शेतकऱ्यांना त्यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेत आपल्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. आंदोलनस्थळी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता .


Recent Comments