बेळगाव शहरातील महंत भवन येथे आयोजित कार्यक्रमाला व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रारंभ झाला.
यावेळी बोलताना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या लेखिका संघाच्या संस्थापक जिल्हाध्यक्षा आशा कडपट्टी म्हणाल्या, महालक्ष्मी महिला मंडळ गेली ३२ वर्षे अतिशय जोमाने काम करत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून महिलांसाठी एक चांगले व्यासपीठ निर्माण झाले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना महालक्ष्मी महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रभा पाटील यांनी महिलांनी घर सोडून बाहेर पडून आपली प्रतिभा दाखवावी. असे आवाहन केले. आमचे महिला मंडळ अशा महिलांना प्रत्येक प्रकारचे प्रोत्साहन देण्यास तयार आहे.

महिला मंडळाच्या सदस्यांनी विनोदी नाटक, नृत्य, एकपात्री प्रयोग व इतर सांस्कृतिक कार्यक्रम केले.

के. रूपा प्रसाद यांनी सूत्रसंचालन केले. नंदा विजापुरे यांनी आभार मानले. प्रतिभा गुडस, शीला गुडस, सुनीता पाटील, शोभा पाटील, वीणा नागमोती, शारदा पाटील, राजेश्वरी पाटील, राजेश्वरी हिरेमठ आदींसह महालक्ष्मी महिला मंडळाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Recent Comments