Belagavi

अधिवेशनासाठी येणाऱ्या सरकारी वाहनावर दगडफेक : सुवर्णसौध जवळील घटना

Share

हिवाळी अधिवेशनासाठी बेंगळूरहून बेळगावमध्ये आलेल्या सरकारी वाहनावर काही जणांच्या टोळक्याने दगडफेक केल्याची घटना बुधवारी सायंकाळी सुवर्णसौध समोर घडली आहे .

बेळगाव शहरासहित आता गावांमधून देखील रिकामटेकड्या उपद्रवी लोकांचा त्रास खूप वाढला आहे . विनाकारण ही टोळकी कोणालाही त्रास देत आहेत . हिवाळी अधिवेशनासाठी बेळगावमध्ये आलेल्या कर्नाटक राज्य कृषी ग्रामीण विकास बँकेच्या मालकीच्या वाहनावर काही जणांनी दगडफेक करून , चालकावरही हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कर्नाटक राज्य कृषी ग्रामीण विकास बँकेचा चालक चेतन याने सांगितले कि , दगडफेक करणारे मराठीत बोलत होते. मी बेंगळूरहून आलोय . विधानसौधजवळील गावाजवळ ही घटना घडली आहे . मला त्या गावाचे नाव माहित नाही . आपण तातडीने वाहनासहित तिथून निसटलो

चालकाने घटनेची माहिती वरिष्ठांना दिली आहे . बेळगाव येथील हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली

Tags: