Belagavi

खेळ आणि शारीरिक व्यायाम मुलांसाठी आवश्यक : श्रीनिवास शिवणगी

Share

बेळगावच्या कॅम्प परिसरातील एन एस पै पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा, वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते…
व्हॉइस ओव्हर : बेळगाव शहरात सुमारे 32 वर्षांपासून कन्नड आणि मराठी मातृभाषा माध्यमांद्वारे शिक्षण देत असलेल्या,आणि अनेक विद्यार्थी केंद्रित कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या , BE शिक्षण संस्थेच्या एन एस पै प्राथमिक शाळेने गुरुवारी वार्षिक क्रीडा संमेलनाचे आयोजन केले होते .

व्हॉइस ओव्हर : या 2022-23 क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन बेळगाव शहर विभागाचे जिल्हा शिक्षण अधिकारी रवी भजंत्री यांच्या हस्ते करण्यात आले आणि श्रीमती पटेल या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या .
मान्यवरांच्या हस्ते या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन प्रथम क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर राष्ट्रगीत गायन, त्यानंतर विद्यार्थ्यांचे भव्य पथसंचलन पार पडले .

त्यानंतर क्रीडा ज्योतीचे आगमन, पुष्पहार अर्पण, शपथविधी पार पडला .

 


यावेळी आमच्या वृत्तवाहिनीशी बोलताना क्षेत्रीय शिक्षण अधिकारी रवी भजंत्री, शाळेचे संघटन सचिव श्रीनिवास शिवणगी आणि मुख्याध्यापिका राधिका नायक यांनी मनोगत व्यक्त केले…

या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन मंडळाचे अधिकारी, शिक्षणाधिकारी, शालेय कर्मचारी, विद्यार्थी, पालक व बहुसंख्य लोक उपस्थित होते

Tags: