महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नियोजित महामेळाव्यासंदर्भात समिती नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये आज बैठक पार पडली.
दिनांक 19 डिसेंबर 2022रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी पोलीस अधिकारी आणि म.ए.समितीचे पदाधिकारी यांची बैठक आज गुरुवारी सकाळी 10-30 वाजता एसीपी चंद्रप्पा यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. डीसीपी रवींद्र गडादी यांनी समिती पदाधिकारी व समितीच्या पदाधिकारी यांच्याकडून मेळाव्याबाबत माहिती घेतली. मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील विविध पक्षांच्या अध्यक्षांना पत्रे लिहिली असून जे नेते येतील त्यांच्याबद्दल आम्ही कळवू, शिवाय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र -कर्नाटकातून नेत्यांना अटकाव करू नये असे म्हटल्याचे सांगितले. यावर महाराष्ट्रातील नेत्यांना येऊ नका असे आवाहन करा अशी विनंती पोलीस अधिकाऱ्यांनी केली. यावर आम्ही आमचा महामेळावा शांततेत पार पाडू, त्यासाठी आपण सर्व सहकार्य करावे अशी विनंती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
बैठकीस कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, चिटणीस रणजित चव्हाण-पाटील, तालुका सरचिटणीस एम. जी. पाटील, विकास कलघटगी, एसीपी नारायण बरमणी, एसीपी चंद्रप्पा, खडेबाजार सी.पी.आय दिलीप निंबाळकर, टिळकवाडीचे सी.पी.आय शेगुणसी आदी उपस्थित होते.


Recent Comments