हॉस्टेलमधील विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणाऱ्या मुख्याध्यापकाला विद्यार्थिनींनी रणरागिणींचा अवतार धारण करून चांगलेच चोपल्याची घटना मंड्या येथे घडली आहे.
या ना त्या कारणावरून हॉस्टेलमधील विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणे एका मुख्याध्यापकाला चांगलेच महागात पडले आहे. विद्यार्थिनींनी रणरागिणींचा अवतार धारण करून चांगलाच चोप दिला. हातात काठ्या घेऊन त्यांनी मुख्याध्यापकाच्या कक्षात शिरून त्याला चोपून काढले. मुख्याध्यापकाने दार बंद करून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यार्थिनींनी जोर लावून दार उघडत त्याच्या कक्षात शिरून त्याला मारहाण करत धडा शिकविला. चिन्मयानंद असे या आंबटशौकीन मुख्याध्यापकाचे नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून, त्यामुळे मंड्या शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Mandya
विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणाऱ्या मुख्याध्यापकाला चोपले !


Recent Comments