Belagavi

हिवाळी अधिवेशनात , उपसभापती पदासाठी नाही इच्छुक : आ . अभय पाटील

Share

काँग्रेस रोडवर , रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांवर चित्रे रंगवून सामाजिक संदेश देण्याच्या उपक्रमाची सुरुवात केल्यानंतर आ . अभय पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला . यावेळी त्यांनी आपण विधानसभेच्या उपसभापती पदासाठी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले .

यावेळी बेळगावमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात तुम्हाला उपसभापतीचे पद दिले जाणार आहे या माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आ . अभय पाटील म्हणाले कि , तुम्हाला याबद्दल कोणी सांगितले हे मला माहित नाही आणि मी या पदासाठी इच्छुक देखील नाही .

यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे अभय पाटील यांनी स्पष्ट केले .

जे पी नड्डा यांच्या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा याना निमंत्रित का केले नाही , त्यांना डावलण्यात येत आहे का या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना आ . अभय पाटील म्हणाले कि , येडियुरप्पा हे आमच्या पक्षाचे जेष्ठ नेते आहेत . आणि त्यांचे पक्षातील स्थानमान उच्च आहे . असे सांगून त्यांनी येडियुरप्पा यांच्या कार्याची प्रशंसा केली .

एकंदरीत आज आ . अभय पाटील यांनी शहराच्या सौंदर्यीकरणबरोबरच , राजकारणातील विविध पैलूंबद्दल पत्रकारांना माहिती दिली .

Tags:

#BJP abhaypatil congress