Vijayapura

उद्या विजापूर जिल्ह्यातील भाजपच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन

Share

राज्यातील 10 जिल्ह्यांतील भाजप कार्यालयाच्या नवीन इमारतींपैकी विजापूर जिल्ह्यातील भाजपच्या नवीन कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन उद्या होणार असल्याची माहिती विजापूर जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष आर.एस.पाटील कुचबाळ यांनी दिली.

विजापूर येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना,विजापूर जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष आर.एस.पाटील कुचबाळ यांनी सांगितले कि , उद्या गुरुवारी सकाळी 7.00 ते 8.00 या शुभमुहूर्तार गो प्रवेश , तसेच होम हवन होईल. त्यानंतर सकाळी 10:00 वाजता राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा या कार्यालयाचे उद्घाटन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला राज्यमंत्री अश्वथ नारायण, भैरती बसवराज, जिल्ह्याचे खासदार, आमदार आणि पक्षाचे नेते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी विजापूर जिल्हा भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते .

Tags: