Banglore

सिद्धरामय्या यांनी अनुसूचित समुदायांकडे ढुंकूनही पाहिले नाही : मुख्यमंत्री बोम्मई

Share

विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी ते मुख्यमंत्री असताना 5 वर्षे अनुसूचित समुदायाकडे ढुंकूनही पाहिले नाही अशी टीका मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली.

बेंगळूर येथील आर.टी. नगर निवासस्थानाजवळ आज प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी अंतर्गत आरक्षणावर मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करणे ही तोंडाला पाने पुसण्याची कृती असल्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री असताना सिद्धरामय्या यांच्यात अहवाल मागवण्याची हिंमत नव्हती. हुबळी येथे झालेल्या अधिवेशनात त्यांनी फक्त दीप प्रज्वलन केले. अशा लोकांकडून आम्हाला शिकण्याची गरज नाही. आमची बांधिलकी काय आहे हे सर्व समाजाला माहीत आहे.

आम्हाला कायदेशीर स्थिती देखील माहित आहे. अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्याची सरकारची हिंमत आहे हे आम्ही दाखवून दिले आहे. दुसऱ्याबद्दल बोलण्यापूर्वी सिद्धरामय्या यांनी मागे वळून पाहणे चांगले असा टोला त्यांनी हाणला.

Tags:

/siddaramaiah-has-not-even-looked-at-scheduled-communities-cm-bommai/